आरोग्य लाभले मज आहे किती निरामय
आभार मम भुताचे मम वर्तमान तेजस
काहीच ना उणीव कुठलीच खंत खेद
घेईन दो करांनी देतेय पूर्व कर्म
जगण्यात भावपूर्ण आरोग्य साथ देते
आत्म्यातल्या जिनाचे गुणगान नित्य गाते
रत्नत्रयास जपणे मम हाच धर्म शाश्वत
लिहिती जिनानुयायी समृद्ध भोवताल
गाणे असेच गावे हृदयातुनी झरावे
लाचार भ्रमित मिथ्य गेले पळून गेले