पुराण इतिहास भूगोल वाचत लिहावं पुस्तक असं वाटतं,
कुणी नाही वाचलं तरी परत परत लिहावं वाटतं.
दशपदीतल्या दहा ओळींचे कशाला मोजावे काने मात्रे,
लय पकडुन अक्षरांवर ओढावे खुशाल सहज फराटे.
काटे फराटे बरे असतात सलामत ठेवतात गुपित जपून,
सरसर झाडावर झटकन पटकन जाते जशी खार चढून,
अजुन अजून अजून म्हणतं बाळ चॉकलेटचा हट्ट धरून,
समजावून सांगावं त्याला जरा आपलं शिशुपण स्मरून.
पुरे बास फार झाले मुक्तछंद केसात माळावा जरा,
ऊस तोडून रानातला सोलून खावा कराकरा.