काया शेजारी आत्म्याची कायेवरती रुसू नको
मोक्षासाठी शरीर साधन काम सोडुनी बसू नको
नको विसंबू दुसऱ्यावरती स्वतः स्वतःला घडवित जा
रत्नत्रय झळकण्या अंतरी मिथ्यात्वाने फसू नको
जगण्यावरती प्रेम करावे जगास मिथ्या म्हणू नये
म्हणशिल जर का जगास मिथ्या जगती पुन्हा दिसू नको
ओळखून शक्तीस आपुल्या जप तप कर्मे करत रहा
चूक स्वतःची जया न कळते तयांस सल्ला पुसू नको
विडंबने लिहिलीस तरीही विनोद निर्मळ लिही खरा
शारीरिक व्यंगावर लिहुनी कधी कुणाला हसू नको
2 responses to “शेजारी – SHEJAAREE”
गझलेतला अध्यात्मिक आशय खूपच सुंदर रीतीने प्रकट झाला आहे.
Thank you