मी न कुठली पाठ करते सिद्धता
सोडवीते पायरीने सिद्धता
पायऱ्यांना गाळले तेव्हांच रे
जाणल्यावर पूर्ण आहे सिद्धता
सिद्ध जेव्हा मी स्वतःला करितसे
यत्न सारे करुन मांडे सिद्धता
ओळखूनी क्षेत्र हितकर मम जिवा
झरत जाते सहज येथे सिद्धता
मी सुनेत्रा नित्य माझी साधना
पक्ष साध्यातून साधे सिद्धता