डोळ्यात धूळ गेली
ढवळून मूळ गेली
धुंडून कोपऱ्यांना
पाहून कूळ गेली
डोक्यात स्वच्छतेचे
घेऊन खूळ गेली
उतरून मस्तकी मम
उठवून शूळ गेली
झालीच गझल भारी
घालून रूळ गेली
रक्ता चटावलेला
मोडून सूळ गेली
तोंडात साठलेली
टाकून चूळ गेली
डोळ्यात धूळ गेली
ढवळून मूळ गेली
धुंडून कोपऱ्यांना
पाहून कूळ गेली
डोक्यात स्वच्छतेचे
घेऊन खूळ गेली
उतरून मस्तकी मम
उठवून शूळ गेली
झालीच गझल भारी
घालून रूळ गेली
रक्ता चटावलेला
मोडून सूळ गेली
तोंडात साठलेली
टाकून चूळ गेली