कळ्या फुले गुलाबाची आणि पाने ओवलेली
रंगसंगती सुरेख हृदयात साकारली
पूर्ण चित्र पापणीत झरझरे वासरीत
हवे हवे ते मिळाले जिनदर्शनाने तृप्त
लिहीत मी जाता सुचे अर्थ लागे अर्थातून
अर्थासाठी अर्थ नवा जगण्याला जीवातून
लिही सुनेत्रा सोनु तू सोनी जसे नाव छान
मैत्र मैत्री टिकू द्यावी बालपणी गाव एक