कडवट होता जरी गझल गुरु
संवेदनशिल तरी गझल गुरु
काय लिहावे शिकवुन गेला
साहित्यातिल हरी गझल गुरु
मातीमधुनी घडे घडवुनी
गेला अपुल्या घरी गझल गुरु
गझल पाहुनी कळ्याफुलांची
झरे सरीवर सरी गझल गुरु
म्हणे मला तो लिही ग मक्ता
तूच खरोखर खरी गझल गुरु
मौन असूनी खूप बोलका
शब्दकोश तो वरी गझल गुरु
काय लिहू मी सांग सुनेत्रा
जादुगार ना अरी गझल गुरु