एक मुक्तक .. थीम
नावात थीम आहे
गावात टीम आहे
सारा भरून सारा
डावात भीम आहे …
गझल …
नावात थीम आहे
गावात टीम आहे ..(जमीन ..मतला)
भावात र्हींम आहे
पावा हकीम आहे..(हुस्न – ए – मतला)
सोन्यास पारखाया
रावा सलीम आहे
अर्थास तोलणारी
आवा मुनीम आहे
सारा भरून सारा
डावात भीम आहे
दर्यास खिळवणारा
कावा गनीम आहे
अंगी कला “सुनेत्रा”
ठावा उदीम आहे