मृद्गंधाचा मस्त धुमारा – SMELL OF WET SOIL


घन, घन झाले, अती अती घन
कोसळेल मग अता कसे हो
अवनीवरती धारांचे धन ?
शीतल वारा हवा यावया
घन मेघांना मृदुल कराया!
वाऱ्यासंगे धावतील घन
नभात अवघ्या सैरावैरा…
नाचत नाचत बरसतील मग
पाऊस-धारा आणिक गारा,
मृद्गंधाचा मस्त धुमारा!!!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.