स्रग्विणी वृत्त जाणायचे आज तू
गालगा चारदा गायचे आज तू
गालगा गालगा गालगा गालगा
हे लगावून वाचायचे आज तू
गालगागा लगा गाल गागालगा
वेगळे सूर ही द्यायचे आज तू
गाल गागालगा गालगागा लगा
यातही कोंबुनी घ्यायचे आज तू
मी ‘सुनेत्रा’ मला ना यशाची नशा
चिंब प्रेमामधे न्हायचे आज तू
स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त)
लगावलीः गालगा गालगा गालगा गालगा
मात्राः २१२ २१२ २१२ २१२ = २०
2 responses to “स्रग्विणी वृत्त जाणायचे – STRGVINEE VRUTT JAANAAYACHE”
खूप सुंदर क्या बात है….
THANK YOU