अढळ सत्य – ADHAL SATYA


मुक्तक…
वाहून गेले डोळ्यामधून सारे खारे पाणी
काळीज सांगे सुकले तपून खारे सारे पाणी
गागा लगागा गागा लगालगा गा गागा गागा
ओळख सुनेत्रा माझी लगावली झरणारे पाणी

मुक्तक …
थरथरे भूमी गव्हाळी रंगलेली
गोठली थंडी सकाळी रंगलेली
वाहने धावून थकली वळण येता
धूळ त्यांवर पावसाळी रंगलेली

चारोळी …
सत्य युगाची अखेर हे तर वाक्य चुकीचे
सत्य युगाचा विनाश हे तर बोल चुकीचे
सत्य सदोदित जिंकत आले शिव सुंदर बघ
सत्य धर्म अढळ हृदयातील जिन सुंदर बघ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.