तुझी वासना ठेव तुज जवळ तू
निजी कामना भावना कवळ तू
कराया निवाडा स्वतः साक्ष हो
जुनी जीर्ण वस्त्रे पुरी सवळ तू
न कोप करता शिकत जावे बरे
उन्हाने तपव देह मथ खवळ तू
कळाया तुला सर्व पर मोह तो
उकळ मौन द्रव्ये तळा ढवळ तू
गुरा वासरांना चरायास ने
बसूनी दुपारी चऱ्हाट वळ तू
अगडबंब होईल काया बरे
सदा जर चघळशिल अवळ चवळ तू
सुनेत्रा पहा मज तुझ्या अंतरी
अणू पीत पद्मावती धवळ तू