जीवांस एक आशा कंदील पेटलेले
चढता उषेस लाली गाणे जयास झेले
फांदीवरील खोपा सुगरण विणे गतीने
शिंपी सुतार पक्षी कार्यात गुंतलेले
पाऊस परसदारी झोडून बाग जाता
सदरे फुलाफुलांचे पानात बेतलेले
गात्रात सौरमाला ग्रह चंद्र सूर्य तारे
छात्रालयात जमले वस्ताद शिष्य चेले
गुलकंद वा बनारस पाने विड्यात भारी
करतात सेठ सौदे लावून पान ठेले
मज आवडे स्मराया चिन्हे चरण तळीची
जिन वासु पूज्य आम्हा रक्षावयास हेले
शेजारधर्म माझा हृदयातली अहिंसा
दे नाव मम मला पण घे आडनाव ले ले
दो पावले धुऊनी जाईल शीण सारा
मी ठेवले चुलीवर भरुनी उदक तपेले
जेथे खरी विशुद्धी तेथे घडेल अतिशय
तव लीड नव “सुनेत्रा” साथी नऊ नवेले