हे घड्याळाचेच काटे सांगती काटे
टोचरे काटे फुलांतिल काढती काटे
हाच तो काटा उरातिल दरवळे घमघम
अंतरीचे शल्य त्याच्या प्राशती काटे
वाट काट्यांची जरी ही साधना आहे
प्रीतिने जाळ्यांस विणती जोडती काटे
त्या रुमालानेच बांधा तोंड पोत्याचे
जे नको ते क्लास त्यांना टाळती काटे
बांग ऐकुन कोंबड्याची जाग आल्यावर
अक्षरांवर मम फराटे ओढती काटे
कोणते क्लासेस तुम्हां पाहिजे सांगा
जे हवे ते ग्लास साकी दावती काटे
प्रिय सराटे कुसुम कंटक गोखरू प्यारे
जे सुनेत्रा कीड पथ्थर झाडती काटे