जगण्यात टेच आहे
सुंदर खरेच आहे
लक्ष्यास बाण भेदे
धनुरात खेच आहे
प्राजक्त बकुळ पुष्पे
लक्षात वेच आहे
करुनी फुकाच घाई
चुकल्यासम ठेच आहे
टोकास पकडले पण
ते नाचतेच आहे
मोहांध जाहलेल्या
प्रेमात पेच आहे
दोषांस झाकण्याहुन
उघडे बरेच आहे
पाताळ स्वर्ग मुक्ती
सारे इथेच आहे
शोधू नकोस नाही
आहे असेच आहे
मी भाव अर्घ्य देते
जापात तेच आहे
जगणे तुझे सुनेत्रा
मजला हवेच आहे