जास्वंदीचे झुमके भारी
कंकण बिलवर तोडे भारी
भूमीवरचे लाल गुलाबी
गुलाब पिवळे खमके भारी
बकुळ फुलांच्या तळी साठले
अत्तर घन मातीचे भारी
वाटिकेतल्या सरोवरातिल
कमळ फुलांवर भुंगे भारी
झेंडू चाफा सदाफुलीचा
वावर रानामध्ये भारी
जुई चमेली शेवंतीची
गजरा फांती माळे भारी
चेरी ब्लॉसम लिली डेलिया
मैत्री डेझी संगे भारी