मुक्तक .. खटका
गाज ऐके बघे अंध बहिरी नव्हे
वात उडवेल तिज लाट गहिरी नव्हे
ओळखावा झणी ताल गझलेतला
बाज खटका खडा गीत अहिरी नव्हे
गझल ..तृषा
चूल पेटे अशी गाव शहरी नव्हे
जल हवा नाचरी लेक लहरी नव्हे
काटकसरी बरा डाव आहे नवा
पीठ घोळून घे तूप जहरी नव्हे
व्यर्थ भीती नको गाज भरती बघू
आपटोनी फुटे लाट गहरी नव्हे
ताप निवल्यावरी लोणचे गोडसर
मूग खिचडी कढी खास तहरी नव्हे
मी “सुनेत्रा” झरा शांत करण्या तृषा
त्या रसोड्यातली तप्त महरी नव्हे