मखमल जणु पाकळ्या फुलांच्या
गुलबक्षी रोवळ्या फुलांच्या
जांभुळलेल्या झळा शबाबी
लाजाळू साखळ्या फुलांच्या
अंगरखा मलमली उन्हासम
गप्पा मनमोकळ्या फुलांच्या
काजळभर दाटुनी पसरल्या
आठवणी सावळ्या फुलांच्या
दवभरल्या पापण्या सुनेत्रा
पैस कळ्या झावळ्या फुलांच्या