झाड पाला पार होता पाळली शेळी आम्ही
पान विकण्या शायरांना बसवले ठेली आम्ही
थेअरी ना वाचली प्रात्यक्षिके केली आम्ही
भावना घाण्यात गाळुन जाहलो तेली आम्ही
ढेप होती आणलेली स्वस्त बाजारातूनी
कवठ पिकले तोडुनीया बनवली जेली आम्ही
गुरगुऱ्या वाघांस पकडुन कोंडुनी काऱ्यात सहज
घोकुनी शेरास सव्वा झोपतो डेली आम्ही
मूळ कारण काय ते ठाऊक त्यांना म्हणती ते
म्हणुन त्या खोटारड्यांशी खेळलो खेळी आम्ही
गोधड्या भिजवून बडवुन वल्लरींवर सुकवूनी
तृप्त झाल्यावर पुऱ्या त्या काढल्या वेली आम्ही
मागल्या सालात बाभुळ कोरफड धन लावूनी
त्याच मग जिमिनीत औन्दा पोसली केळी आम्ही