दुलई – DULAI


नववर्षाचा हरेक दिन हा …
नित्य नवी मज देतो ऊर्जा…
सूर्य उगवण्या आधी माझी …
सळसळण्या बघ लागे ऊर्जा ..
. काय लिहू मी आज नवे रे.. चैतन्याने भरून वाहण्या … ?
प्रश्न मला हा कधी न पडतो… …. … …. .. .. . .. . .. ..
साकी भरते माझा प्याला…. साकी भरते माझा प्याला .माझा प्याला .
लिहिता लिहिता सांडू लागतो … संगणकावर पिऊन वारा…

गा वाऱ्या तू गा गा गाणे …माझ्यासंगे… झुळझुळणारे ..
गा नीरा तू ..निर्झरातल्या… माझ्यासंगे मुक्त तराणे …
….. अजून पाखरे घरट्यामध्ये दुलई ओढून गाढ झोपली…
जाग यावया घरट्याला मग … झाडांसंगे जमीन नाचली…

चला उठा व्हा सज्ज न्हाउनी दव भरलेल्या मम धवल अक्षरी …
जिनदेवाचे दर्शन घेण्या चला फुलांनो जिनमंदिरी ..
चला चला हो ..जिनमंदिरी…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.