धाडस येते हळूहळू हळूहळू
असत्य लागे दूर पळू हळूहळू
कर्म निर्जरा सहज करू कळेल मग
फक्त लागला देह मळू हळूहळू
अता फटाके वाजवणे बंद करू
लागो त्यांचे बूड जळू हळूहळू
चपटी होता तळुन बिळुन पुरी बिरी
वाळवून खोबरे तळू हळूहळू
श्वान लागता पाठीशी घाबरुनी
बावचळुन तो म्हणे वळू हळूहळू