रुबाई …
घेतात विसावा गुरे वासरे गाई
डोळ्यात दाटते हिरवी कुरणे राई
हा निसर्ग देई दान इथे अन तेथे
हा शांत मनाच्या पार इथे अन तेथे
गझल … नरद
कसे फिरवशिल नरद पटावर बुद्धीबळाच्या बोल
विकून चिक्की नक्की बिक्की चाली तुझ्या तू टोल
मिरवायाला मोठेपण बघ घाई किती रे तुझी
कुणी न उत्सुक उरली प्यादी बडवीत बसण्या ढोल
उंट चालतो तिरकस तिरके घोडा अडीच घरात
बादशाह वा राजा असुदे वजीर हाजीर गोल
पुरे जाहले वाकड बीकड सरळ लंघण्या रेषा
धरून दांडू कलता थोडा खच्चून विटीस कोल
खेळ कबड्डी खो खो लंगडी लपंडाव कर्मांचा
भाव निरागस शुद्ध “सुनेत्रा” अर्थ खेचण्या सोल
…
भवाभवांची करून यात्रा मोक्षपथावर आले
तीर्थंकर अरिहंत सिद्ध मम अंतिम मॉडेल रोल
प्रियजन गुणिजन संयम संगे ज्ञान निरामय वाढो
आत्मशक्तिने घडेल अतिशय गळून जाण्या झोल
…
अष्टद्रव्य सजवुनी ठेवले तबकात सोनियाच्या
भावअर्घ्य दे अर्थामध्ये उतरून जाण्या खोल
पंचपरंपद मंत्रामधुनी णमोकार साकार
नाती जपण्या फुले प्रमाणा हृदयातून अनमोल
न्यायदेवता सम्यकदृष्टी वर्धमान करी तुला
करेल आता खरा निवाडा वर्तमान समय तोल
कथा समीक्षा कविता गीते हवेहवेसे सारे
कौल घ्यावया साहित्यातुन मौन गझलेवर डोल
…
मौन कुणाचे सांग जिनवरा नावाहुन आडनाव
शेर वाढता पुनश्च मक्ता पंड्या चोळ की चोल
लेक भराया शुभ भावांनी अर्पून पुष्पांजली
फोडुन शेंगा सोन्य बियाणे टरफल कोंडा न फोल
जलद गज गती राजपथावर उडवून दाणादाण
चौदाव्या गुण स्थानाचरणी एल ओ एल ग लो ल