निर्भेळ भेळ माझी आहे गझल गुणांची
दिलदार खेळ माझी आहे गझल गुणांची
ताशा गिटार बाजा वेणू नवी तुतारी
संगीत मेळ माझी आहे गझल गुणांची
देहास सत्त्वदायी ओटी भरून देण्या
उजवेल केळ माझी आहे गझल गुणांची
रत्नेच जी अपत्ये त्यांना सुखे रहाया
साधेल वेळ माझी आहे गझल गुणांची
परिणाम मी न जाणे हेतूत आत्मगोष्टी
म्हणतेय हेळ माझी आहे गझल गुणांची
शब्दार्थ
हेळ – सांग