झाले भावघन गोळा नाती सायीहून दाट
लोण्यासाठी विरजल्या राती सायीहून दाट
वावटळी चक्रीवात धूप कर्पूर गाभारी
झाले बीज अंकुरीत माती सायीहून दाट
बंध तोडायचे कसे जोडणारी मुळाक्षरे
ओततात नोटा नाणी पाती सायीहून दाट
धान्य सुपात ओताया पोती माय सोडते ही
जाती गळे मौन कर्म घाती सायीहून दाट
पंचभुते डोलताती ताल ठेका देह देतो
कंठातून मुक्त गीत गाती सायीहून दाट
गाभाऱ्यात जिन मूर्ती तेवणाऱ्या दीप ज्योती
सांज आरती तूपात वाती सायीहून दाट
लेकरांचे सुख सांडे आनंदाश्रू सुनेत्रात
माय मराठी प्रकृती हाती सायीहून दाट