भावात देव आहे शोधा कुठे कपट ते
आत्म्यास साक्ष ठेवा शोधा कपाट पट ते
हिरव्यात कृष्ण धवला राखाडि लाल पिवळा
चौकट बदाम किल्वर इस्पीक चार पट ते
मम खेळ बिनपटाचा भासे जरी जनांना
तत्त्वार्थ सूत्र खेळी जीवाजिवास पटते
चाफ्यासमान सोने हळदीसमान औषध
आराधनेत तपुनी होईल काळपट ते
शेरात पाचव्या लिहितेय नाव माझे
मांजापरी सुनेत्रा सत्यास फक्त पटते