पूर्ण कलायुत चंद्र धराया काक उडाले बाई
हळदी कुंकू वाहुन स्वप्नी जागे झाले बाई
ठार कराया मज शस्त्राने फरशी परजत आले
मम कलमावर फक्त धडकता अंध जाहले बाई
माझे जीवन रंगबिरंगी कृष्ण धवल पण त्यांचे
बूच उघडता रंगकुपीचे फाल्गुन झाले बाई
कर समझोता हिटर म्हणाला म्हणुन निकट मी गेले
हाती घेता तप्त करा त्या फ्यूज उडाले होते
भाव सुनेत्रा कलम टिपे मम झरता अक्षर धारा
टपटपणाऱ्या रंगसरींना गझल म्हणाले बाई