KATHA बहावा …
असा बहावा पैस फुलावा
डोंगरमाथी अथवा दारी
आईदादा फुलांत हसता
मेघांनी शिंपावी झारी ..
Ghazal गझल…
मी मात्रा ऐशी मंत्रात वळे जादुई
वीज नभी जैशी मंत्रात वळे जादुई
देऊनी तडका तोऱ्यात निघाली बयो
धन दर्शन तैशी मंत्रात वळे जादुई
कोणी तिज कळवा दिसते ती आता तरी
हसताना कैशी मंत्रात वळे जादुई
कुंकू टिकल्यांच्या रंगून स्मृती जोडते
नाते पै पैशी मंत्रात वळे जादुई
गझल बहावा मम चित्रात सुनेत्रा सही
लखलखते वैशी मंत्रात वळे जादुई