कंठ मोकळे झाले सारे
बंधमुक्त मम हृदयी तारे
दहा दिशांतुन तरंग लाटा
वरती खाली समुद्र वारे
बैस तपाला सागर तीरी
रत्नाकर ज्ञानामृत चारे
आहाराला मुनी निघाले
भो स्वामी ! मन गजर पुकारे
हरेक घरटी आता भौरी
बांधा तोरण घुमवा नारे
दंडी सळया गज पोलादी
तोडा भिंती फोडा कारे
बांध “सुनेत्रा “सुबक हवेली
बसव उंबरी मांजर घारे