मांजर बघते मिटून डोळे मांजर असते हुशार खूप
मस्त कलंदर मांजर भोळे मांजर असते हुशार खूप
हवे तेच जे स्वतःस करते मांजर नसते कधी गुलाम
मोक्षाच्या वाटेवर लोळे मांजर असते हुशार खूप
कधी शिकारी तर हलवाई उन्हात बसते अटवित क्षीर
थंड खव्याचे करते गोळे मांजर असते हुशार खूप
उंचावरती बसून घाले गस्त नेहमी वळवित मान
हातावरती हात न चोळे मांजर असते हुशार खूप
जाण मूळ कारण मेहाचे चिनी शर्करा साखर गूळ
मधमाशांसह रक्षू पोळे मांजर असते हुशार खूप
लाड पुरवण्या स्वतः स्वतःचे गत जन्मातिल जन्मा येय
उरल्या सुरल्या इच्छा मोळे मांजर असते हुशार खूप
साळीच्या शेतातिल राशीं तांबड्या मृदेत धवल खळीं
खडे काढण्या अक्षत घोळे मांजर असते हुशार खूप
आत्मा शाश्वत केवळ साक्षी बाकी घडवे कर्मच ऐक
घालुन ऐके कानी बोळे मांजर असते हुशार खूप
नाव सुनेत्रा अधिक नकाते अंक अक्षरे मोजुन तोल
दिगंबरां भूषण अक्कोळे मांजर असते हुशार खूप