हात देण्या नेक ताली राहण्या
त्यागिली मी ती रुदाली राहण्या
सूर ठेका लय स्वराची साधना
गालगागा गा गझाली राहण्या
शांत जागा अंतराळी शोधली
मौन कर्तव्ये खयाली राहण्या
शांतता आत्म्यात माझ्या नांदते
निवडली ऐसी प्रणाली राहण्या
सत्य मी जाणे सुनेत्रा जाणती
माळ माला माल माली राहण्या