अंतरी चैतन्य आहे लक्षपूर्वक ध्यान कर
प्रगटण्या सत्यास मनुजा तू कट्यारी म्यान कर
ही धरा दासी न अपुली ही खरी राज्ञी इथे
जाण आत्मा आचरण स्मर फक्त गप्पा त्या न कर
जे पटे तुज ते करावे कर्मफळ देणार ते
व्हावयाला आत्मनिर्भर धाडसी हो भ्या न कर
अंधश्रद्धा काय असते जाण आधी सांगण्या
प्रवचने अन कीर्तने कर मंडपी आख्यान कर
पेर बीजे लाव रोपे जगव त्यांना बहरण्या
पुनरपी प्राणास भरण्या फिरव देही व्यान कर
कारखाने सतत चालू लागल्या जणु शर्यती
नीज येण्या शांततेने रात्रिच्या पाळ्या न कर
भाव शिंपत घाम गाळत निर्जरा होते जलद
वाळवंटाच्या कसूनी वाटिका उदयान कर