रंगले रंगात तम हे रंग कुठला ओळखावा
नाव जल्लादास कुठले भाव कैसा त्यास द्यावा
गर्व तुजला हा कशाने वाद अजुनी चालला रे
गर्व म्हण वा स्वत्व त्याला भाव सच्चा पारखावा
काल दोहे आज ओवी गझल परवा आत्मधर्मी
न्याय करण्या ठेव अंतर फक्त साक्षी ध्यास घ्यावा
हक्क माझा मीच घेते मस्त मक्ता वृत्त खाशी
मी कशाला माझियावर वार करण्या गर्व प्यावा
गजल गज्जल गझल मुक्तक वा रुबाई मम सुनेत्रा
लिहित जाते जीव जगण्या म्हणत जा तू वाह वा वा