उडवित रंगा अवखळ दंगा कशास पंगा गझल बाई मी
कट्यार नंगी झळकत अंगी तळपत जंगी नवल बाई मी
मातृ पितृ मम धर्म प्रिय खरा कमळ फुलांचे सुटूदे सत्त्वर
अनवट कोडे पायी जोडे करात तोडे तरल बाई मी
लीड घेतले सन्मानाने जगण्यासाठी वाण वसा जैन
जिनवर अंबर शिवमय सुंदर सत्य धरोहर सरल बाई मी
गरगर फिरती रदीफ संगे कृष्ण काफिये गोळा नवनीत
भांग असूदे रांग असूदे डांग असूदे धवल बाई मी
गलबत बोटी धक्क्यावरती हरित किनारा काव्यांकित तनू
दिवस गव्हाळी ऊन उन्हाळी सांज न गाळी सजल बाई मी
अलामतीवर दर्द फिदा मम झरतो वळतो कडे कपारीत
जीव सलामत जणू विरासत करे करामत कुरल बाई मी
सल काटेरी अभिनय उपजत उमटे कायेवरती सुनेत्रा
खिरून जाई टाळत खाई मुळी न घाई अचल बाई मी