शकट
प्रगट म्हणो वा प्रकट कुणी पण अर्थाचा ना अनर्थ ल्यावा
व्यूह म्हणो वा शकट कुणी पण अभिमन्यूचा जीव न जावा
अर्थांचे झिरझिरित पदर जरी अर्थ त्यातुनी नेकच घ्यावा
झिमझिम रिमझिम श्रावण सावन मन भावन सर्वांना व्हावा
….
कटी
श्रावण वा आषाढ असूदे निर्झर बाला मुक्त खळखळे
उथळ पात्र वा खंदक खोली समीर वारा गात झुळझुळे
हवा पवन अन वात वादळी उदक नीर जल पाणी उसळे
कटी कमर घट घडा तिच्यावर गवत डोईवर हाती विळे
…
होडी
डोली पालखी जीवासाठी
संथारा सखी जीवासाठी
देही विदेही शरीर काया
होडी सारखी जीवासाठी
…