अंकात ना अडकते अक्षर शबाब होते
मी आकडे न मोजे मौनी गुलाब होते
कुठल्याच पुस्तकांचे माझे दुकान नाही
माझी दुकानदारी माझा रुबाब होते
अन्नास ठेव झाकुन होताच गार अलगद
राहील ते टिकूनी ना ते खराब होते
तो ब्रम्हदेश अस्सल माझाच वाटता मज
चित्रात कृष्ण धवला रंगून बाब होते
आहेच मी सुनेत्रा मम क्षात्रतेज तळपे
मेयर कवी कुलाची शाही नवाब होते