संग ठरवण्या आधी बोले अरेतुरेची भाषा
तयांस उलटे देते टोले अरेतुरेची भाषा
अनोळख्यासम जरी भेटली कपट जाणते अंतर
दांडूने करकचून कोले अरेतुरेची भाषा
फुकट घरगडी मिळतो जेव्हा फिरावया बाजारी
सवंगड्यांसह डाळिंब सोले अरेतुरेची भाषा
नऊ नव्याचे दिवस सोंग ते हाव अहं जड भारी
शिवून खोळी भरून तोले अरेतुरेची भाषा
शील ज्ञान गुण सेवा यांची असे “सुनेत्रा” मैत्री
ऐत्या रेघोटयांवर डोले अरेतुरेची भाषा