मातृ पितृ धर्म ऐक्य सहज लक्ष्य आहे
माझिया करात फिरवण्यास अक्ष आहे
साक्ष द्यावयास आस श्वास हजर असता
तोलण्यास शब्द अर्थ भाव दक्ष आहे
बोलती जरी असत्य सत्य त्यास म्हणती
वादळात कातळी तटस्थ वक्ष आहे
कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष सौरवर्ष सांगे
कोणता खरेच नित्य शुद्ध पक्ष आहे
मी समर्थ रक्षिण्यास आत्मधर्म माझा
प्रार्थनेत पण तुझ्याच रक्ष रक्ष आहे