सर्व लक्ष्म्या पावल्यावर पावते मन मोक्ष्मलक्ष्मी
जीवनाचे रंग सारे दावते मन मोक्ष्मलक्ष्मी
लाभण्या संसार शांती लेकरांना हिमनदीने
घेतली जेथे समाधी बाव ते मन मोक्षलक्ष्मी
सांजसमयी गोधुलीला जीव ध्यानी लाल गोळा
अंतरीच्या दीपज्योती लावते मन मोक्षलक्ष्मी
चेहऱ्यावर सरलतेचे भाव तपुनी वर्तमानी
लेक नाती सून सासू राव ते मन मोक्षलक्ष्मी
मिळविण्या मध पेटवीता भडकुनी मोहोळ उठते
भृंग होते भिंगुनी घोंगावते मन मोक्षलक्ष्मी
शांत होता रानवारे अंतराळी पावसाळी
संयमाने लक्ष्य गाठे धावते मन मोक्षलक्ष्मी
आत्मसाक्षी मी “सुनेत्रा” पार होण्या भव भवान्तर
भूतकाळातील सुंदर भाव ते मन मोक्षलक्ष्मी