नग्नता … ..
जगवते कैवल्य खिरते चांदणे चंद्राप्रमाणे
काफिया मम मातृधर्मी नग्नता बापाप्रमाणे
मुक्तकांची स्वर्णमाला ओविली आहे फुलांनी
वेळ मजला हात देते सावळ्या काळाप्रमाणे
सांची ..
अंजना हिडिंबा शूर्पणखा वा सीता
स्वाध्याया आगम वेद बायबल गीता
सोन्यात जडवुया माणिक मोती पाचू
ज्ञानेश्वरी ग्रंथि कुराण शास्त्रे वाचू
वैडूर्य पोवळे पुष्कराज हिरा खाण
नीलम आणिक गोमेद नवरत्ने जाण
हृदयात स्थापना रत्नत्रयी धर्माची
जीवास भावते जिनबोली प्रिय सांची