तीन मुक्तके ..
१)अस्सल
कुठलीच गोष्ट आम्ही फुकटात घेत नाही
अमुच्या मतास अस्सल सौद्यात देत नाही
आत्माच साक्षी आहे रत्नत्रयास अमुच्या
जिनदेव अंतरी मम मिथ्या सवेत नाही
…
२)सिद्धशैली
कोर चंद्राची कपाळी सिद्धशैली
भोर मायेची नव्हाळी सिद्ध शैली
डोलते आहे गडावर जिंकुनी फड
माझिया कार्यास माळी सिद्धशैली
…
३)भाषांतर
स्वैर न मम भाषांतर आहे उत्कट माझी काव्यसंपदा
ऋतू ऋतूंचे अनवट नाते अक्षरधन फळफळले अवचित
पहाट नीरव गगनी तारे अंतर्यामी नाद अनाहत
शिशिरामधले धुके मलमली झरले खुलले खिरले अवचित