हिवाळी चऱ्हाट …मुक्तक रुबाई चारोळी
तंबाखू ..
हिवाळी ऊस सोयाबीन ज्वारी डोल डोले
गव्हासंगे खुली शेती सुपारी डोल डोले
हवा गाई दवारूनी दळे दळण मरुदेवी
उभ्या वाफ्यात तंबाखू गवारी डोल डोले
पानमळा ..
बाजरी कपाशी मका पानमळा सावळा
सावलीत बसुनी विडा खात चऱ्हाटा वळा
टेकलेय क्षितिज जिथे शुभ्र घनांची शिडी
कार्तिकात निर्झरात कृष्ण निळा सावळा
केवडा ..
गळ्यातुन गाणे झरे ठेका पावलात
गळाभर मोतिमाला पकड वाऱ्या ताल
खोचलेय कुंतलात केवड्याचे पान
घे “सुनेत्रा “तू तुझ्या अक्षरांचे वाण