धुनी – DHUNEE


कृष्ण निळ्या घनमाला गगनी कपोत वर्णी ढग काळे
तप्त मृत्तिका तहानलेले धावधावती मृग काळे

झुळझुळणारे जल आभासी आतुरलेली वसुंधरा
दूरदूरवर क्षितिजावरती फिरत राहती खग काळे

वळिवाची चाहूल न देता दिशा बदलली वाऱ्याने
कोसळण्या भूवरी सागरी मेघ दाटले मग काळे

संवादाविन युद्ध पेटता कारण कुठले कळे कुणा
धुनी समुद्री मार्गावरती दिसू लागले जग काळे

मुसळासम अंतरास कांडत श्वास “सुनेत्रा” घेताना
ओघवत्या शेरांतुन सांडे भावधवल धन वग काळे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.