साधना – SADHANA


काय साधले त्यांनी… त्यांचे त्यांना लखलाभ
मातृधर्म माझा ….जपेन मी अंतापर्यंत
जिनधर्मी आहे… अहिंसा माझ्या आत्म्याचा स्वभाव
संवर आणि निर्जरेने … साधेन माझी साधना
शब्दांवरती प्रभुत्व असो नसो ….
माझे शब्द कधीच नाही करणार जीवांचा घात !
करेन कसरती अक्षरांना जुळवित
पण जीव जपेन… जीव जपेन ….
मीच माझ्या… जीवनाची जादू !!
माझा मातृधर्म !!आत्मधर्म!!!!! हाच माझा स्वभाव !!!
तोच करेल मला मार्गदर्शन …
माझ्या इथून पुढच्या प्रवासात … प्रत्येक निर्णयात …
जेवढी आयु तेवढे जगेन मोक्षासाठी पुरुषार्थ करेन…
मला ना मोह देहाचा …
टाळणार आर्त रौद्र ध्यान … हाच राहील प्रयत्न यत्न… अगदी अंतापर्यंत
संसारातून मिळवण्या मुक्ती …
आत्म्याची माझ्या शक्ती !
मला दाखवेल अंधारात वाट !!
जाईन पुढे ……
अंतरीच्या जपेन जैनत्वाला !
आत्म्यावर माझी दृढ श्रद्धा !!…….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.