टिनपाट – TIN PAAT


वाट्यावर आलाय अहाहा ! जिनशासन आहे
कोंढाणा कोंढवी रहावा जिनशासन आहे

जपुन ठेवल्या सयी सईच्या कामाला आल्या
जुनाट नोटा पडका वाडा जिनशासन आहे

कोण हावरट कळेल आता शासन कोणाचे …
आडगुडीतिल गुड्ड पडावा जिनशासन आहे

भवन भुवनी स्थावर जंगम शेत रान बागा
तोंडी जमता फेस गिळावा जिनशासन आहे

ओळीमध्ये उभे राहिले पुतळे धातूंचे
टिनपाट करी धर प्रक्षाळा जिनशासन आहे

मंदिरमार्गी स्थानकवासी एक जाहले का ….
सुंदर कल्पक छंद जडावा जिनशासन आहे

कळसु नेत्रा सह्याद्रीवर उत्तुंग शिखर जी
जी जी म्हणते किरण शलाका जिनशासन आहे ! ! . .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.