दिडदा दिडदा सतार सुंदर
मोक्षपथावर विहार सुंदर
मधुर मधुर गातात अरण्ये
घन आषाढी किनार सुंदर
तार लाव वा अतार असुदे
जिनभक्तीची बहार सुंदर
कनक पाटल्या बिलवर तोडे
रंग कंकणी अनार सुंदर
छहढाली मम आत्महितास्तव
फिरे लेखणी कट्यार सुंदर
श्रीरंगाची काष्ठ बासुरी
कुणास द्यावी उधार सुंदर
नजर सुनेत्रा नासाग्री तव
ध्यान समाधी तिहार सुंदर