भूतकाळच्या सयीत भिजली वर्दळ भूमीताई
फांद्या पाने झाडे ओली हिरवळ भूमीताई
आभाळातिल मेघ तयांची श्यामल वर्दी गर्दी
कोसळून घन निर्झर वाहे खळखळ भूमीताई
तनमन रोमांचित करणारी श्रावणसर शिरव्याची
उडून गेली अंगांगातिल मरगळ भूमीताई
अवतीभवती बागडणाऱ्या पक्ष्यांना प्राण्यांना
वेड लावतो मृदगंधाचा दरवळ भूमीताई
सुखे गावया कोकिळ बुलबुल वनराईतिल मैना
भ्रमरांची नव पानांमधुनी सळसळ भूमीताई