पीत गुलाबी दल पर्णांकित खोड उभे पाठी
नाजुक कुसुमांच्या रंगांच्या सोडविण्या गाठी
झाड फुलांनी भरून गेले पानांची गर्दी
हलवुन फांद्या मीच पाडला पाऊस माझ्यासाठी
भल्या पहाटे सुखद गारवा हवा लपेटुन तना
भिजल्या वाटेवरुन जातसे गात पुढे मी मना
मना तुझिया संगे करते मी गप्पागोष्टी
मोर कोकिळा साद घालती संवादासाठी
चला उमटू द्या अंतरातुनी हवेहवेसे गीत
गझल करा वा गोष्ट तयाची सांगाया हितगुज