उदक – Water


नऊ रस काव्यातील झरले ..
नऊ जिनायतनी रमले ..
उगाळ मात्रा बारा सोळा अंदाजाने
उदक गाळुनी शिम्प झारीने .. कोरफडीवर !
फुलतील पर्णे कडा कंटकी …….
रसरसलेले पर्ण गराने … किती औषधी !
जाण तयातील तप गुण वृत्ती!
अर्थ काढण्या मम काव्यातील ..
नव कैफियत मुख्यार्थाची…
एक सरळ रेषा असते रे
मोक्षगामी निश्चयाची,,,,,
अल्प स्वल्प मम विरामचिन्हे
व्यवहार पाळुनी मिटवी गुन्हे.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.