झाड – Tree


मन शांत शांत झाले ..
आभाळ रंग वर्षत रंगून तृप्त झाले..
शरदातल्या पहाटे मन हरित कंच झाले..
लिहू काय आज आता उमगे न मम मनाला
इतुके भरून झरूनी मन चित्त शुद्ध झाले ..
झाडांत झाड डोले …बहरून सोनचाफा…
वाऱ्यावरून आला आला सुगंध आला
घेऊ किती भरूनी श्वासात गंध दरवळ..
झाली दुपार तरीही करते पहाट सळसळ
लेऊनी वसन ओले वाहे दुपार झुळझुळ वर्षत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.