मिसळ – MISAL


कधी खावी मिसळ
कधी मटकी उसळ
मटकी मोडाची
मैत्रीण लाडाची
मैत्रीण गोरटी
नजर चोरटी
नजर लागली
बाहुली सुकली
बाहुली नकटी
सुंदर छाकटी
सुंदर सुंदर
कित्ती बिलंदर
बिलंदर माऊ
चल साय खाऊ
साय आणि साखर
मायेची पाखर
मायेचं माहेर
माहेरची वाट
वाटेतला घाट
घाटातली झाडी
झुकझुक गाडी
गाडी गाते गाणे
पाखरू दिवाणे …….

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.